रवळनाथ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते वसंत घाटाची स्वच्छता करताना. |
चंदगड / प्रतिनिधी
रवळनाथ गणेशोत्सव मंडळ च्या कार्यकर्तेनी मंडळाच्या वतीने श्रमदानातून चंदगड शहरात अनेक उपक्रम राबवण्यात आले चंदगड शहरातून हेरे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे धोकादायक बनला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व बालचमूनी खड्डे भरून श्रमदान केले व गौरी गणपती विसर्जन नंतर वसंत घाट व जॅकवेल कडील घाट साफसफाई करण्यात आली. या मंडळाच्यावतीने केलेले श्रमदानाचे ग्रामस्थाच्या वतीने कौतुक होत आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील सुभाष हळदणकर, उपाध्यक्ष अभिजीत प्रमोद कर्पे, सुनील काणेकर (संजय गांधी निराधार तालुका अध्यक्ष) व कार्यकर्ते यशराज गजानन, कालेलकर पृथ्वीराज, संतोष चव्हाण, प्रेम प्रवीण बल्लाळ, ओमकार कमलाकर गावडे, सागर गजानन नांदोडकर, सूरज सदानंद धाटोंबे, अमर मधुकर पेडणेकर, सचिन गणपती परीट, परशुराम लक्ष्मण तलवार , सुनील हळदणकर, नांदोडकर,सुरज धाटोंबे, औदुंबर मोरे, सौरभ जुवेकर, योगेश शेलार, उमेश पिळणकर, ओमकार गावडे, सोहम सूर्यवंशी, परशराम तलवार यांची उपस्थित होते..
No comments:
Post a Comment