चंदगड/प्रतिनिधी :-- किणी ता.चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कुट्रे यांनी गणेश मुर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. अमोनिअम बायकार्बोनेटचा वापर करत श्रीच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करून पाणी प्रदूषणास काही प्रमाणात आळा घातला आहे. गेल्या काही वर्षपासून त्यानी हा समाजपयोगी उपक्रम राबवला आहे.यावर्षी कोरोना महामारीमुळे लोकांचा संपर्क व संसर्ग होऊ नये यासाठी लोकांना घरच्या घरी विसर्जन करण्याचे आव्हान केले. तसेच स्वतःच्या श्रीचे विधीवत पूजा करून घरच्याघरी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन केले. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.पहिल्या वर्षी त्यांनी शाडूच्या श्रीमूर्तीचे आपल्या घराच्या मागील जागेत असलेल्या बागेत टपामध्ये विसर्जन करून शाडू व निर्माल्य बागेतील झाडांना खत म्हणून घातले.तर नागरदळे गावचे डॉ.प्रदीप देवण यांनी श्री कूट्रे यांचा अभिनव उपक्रम पाहून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी त्यानी अमोनियम बायकार्बोनेट देऊन मोलाचे सहकार्य केले. त्याचा वापर करून आपल्या बागेत मोठ्या हौदामध्ये हुंदळेवाडी व किणी येथील 25 भाविकांच्या मूर्तीचे विसर्जन केले. तसेच ते निर्माल्य व आमोनिया मिश्रित पाणी बागेतली झाडांना खत म्हणून वापरले.
28 August 2020
Home
chandgad
किणी येथे पर्यावरणपूरक गणेश मुर्तीचे विसर्जन
No comments:
Post a Comment