चंदगड/प्रतिनिधी:--- हुंदळेवाडी ता.चंदगड येथे मोठया पर्यावरणपुरक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम पर्यावरणपूरक जलकुंभ तयार करण्यात आला होता
मोठ्या श्रद्धेने प्रतिष्ठपना केल्या जाणार्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन आपले पाण्याचे स्त्रोत असलेले नदी, विहिरी, तलाव, बंधारे इत्यादी ठिकाणी केले जाते त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होऊन पर्यावरणाची हानी होते, म्हणून धार्मिक भावना व वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड घालून हा उपक्रम राबविला जातो आहे.
घराजवळ विर्सजनासाठी कृञिम पाण्याचे कुंड तयार करण्यात आला होता. त्या कुडांतील पाण्यात मिसळलेल्या अमोनियम बायकार्बोनेटशी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचा संपर्क आल्यानंतर त्यामधून अमोनियम सल्फेट तयार होते, ते पिकांना खत म्हणून वापरले जाऊ शकते. निर्माल्य व सजावटीच्या वस्तू बाजूला काढून फक्त मुर्ती त्या पाण्याच्या मिश्रणात विर्सजन करण्यात आल्या.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी गेली 2 वर्षे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विर्सजनाचा उपक्रम डॉ.प्रदीप देवण ( नागरदळे )आणि संजय कुट्रे (किणी) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.
यावेळी जोतिबा बामणे, सुभाष बेळगांवकर, अक्षय बामणे, कृष्णकांत बामणे,नागेश बामणे, नारायण बामणे, डॉ.आप्पासाहेब बामणे , जानबा बेळगांवकर, लक्ष्मण बामणे, पुंडलिक बेळगांवकर, उदय बामणे आदि गणेश भक्त उपस्थित होते.
No comments:
Post a Comment