कडलगे येथे आईच्या दिवसकार्यानिमित्त रोपांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2020

कडलगे येथे आईच्या दिवसकार्यानिमित्त रोपांचे वाटप

चंदगड/प्रतिनिधी:--- कडलगे बुद्रुक  ता. चंदगड येथील निवृत्त प्राचार्य के. एच. पाटील यांनी आपल्या आईच्या दिवसकार्यानिमित्त आगळा उपक्रम राबवत  गावातील  नागरिक व नातेवाईकांना २०० रोपांचे वाटप केले. यावेळी पाटील म्हणाले, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. इथून पुढे प्रत्येक स्मृतिदिनानिमित्त रोप वाटप करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेल, काजू, पेरू, आंबा आदी प्रकारची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी राजू पाटील, नामदेव पाटील, ज्ञानेश्वर पाटील,  राकेश पाटील, सोनम पाटील, वेदांत पाटील, निवृत्ती पाटील, संजय पवार, विक्रम पाटील, अशोक कांबळे, भाऊराव कांबळे, तुळसा पाटील, पी. एच. पाटील, पुनम पाटील आदी उपस्थित होते. काजल पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment