सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या यशासाठी स्वातंत्र्यसैनिक पत्नीची गणरायाकडे प्रार्थना - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2020

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या यशासाठी स्वातंत्र्यसैनिक पत्नीची गणरायाकडे प्रार्थना

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
  छोडो भारत चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धासह चार लढाया गाजवलेल्या स्वातंत्र्यसेनानीची पत्नी तसेच पाकिस्तान सीमेवर लढणाऱ्या दोन पुत्रांची माता मुलांच्या गैरहजेरीत खंबीरपणे गणेशोत्सव करून देशाच्या सीमेवर तैनात सर्व सैनिकांच्या यशासाठी गणेशाकडे प्रार्थना करते.
 श्रीमती कृष्णाबाई गोविंद चव्हाण  असे त्यांचे नाव असून निपाणी (कर्नाटक) येथील महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह चळवळने प्रेरित झालेले स्वातंत्र्यसैनिक गोविंदमामा चव्हाण यांच्या त्या पत्नी आहेत. गोविंद मामा यांनी १९४२ सालच्या छोडो भारत चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भारतीय सैन्यात दाखल होऊन १९४५ चे दुसरे महायुद्ध, १९४८ व ५० ची भारतात उसळलेली दंगल, १९५६  पाकिस्तान बांगलादेश फाळणी, १९६२ व ६५ चे चिन आणि पाकिस्तान विरुद्ध युद्धात पराक्रम गाजवला होता. आत्ता त्यांचे पुत्र सुभेदार मेजर गजानन चव्हाण ७ मराठा  व रवींद्र चव्हाण १२ मराठा इन्फंट्री तून जम्मू काश्मीर मधील लेह, लद्दाख मध्ये शत्रू सैन्याशी दोन हात करत आहेत. तथापि त्यांच्या ९५ वर्षीय मातोश्री कृष्णाबाई यांनी पतीच्या निधनानंतरही  निपाणी येथील घरी गणेशोत्सवात खंड पडू दिला नाही. त्या दरवर्षी घरी गणरायाची प्रतिष्ठापना करून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व जवानांच्या दीर्घायुष्यासाठी व शत्रूविरुद्ध पराक्रम गाजवून यशस्वी होण्यासाठी साकडे घालत असतात. या निमित्ताने वीरपत्नी व वीरमाते प्रति आदर मात्र द्विगुणीत होत असतो.

No comments:

Post a Comment