कोवाड येथील ताम्रपर्णी नदीकाठावर भावपूर्ण वातावरणात गणपती विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2020

कोवाड येथील ताम्रपर्णी नदीकाठावर भावपूर्ण वातावरणात गणपती विसर्जन

कोवाड / (प्रतिनिधी )
चंदगड तालुक्यातील कोवाड येथे ताम्रपर्णी नदीकाठावर आज सर्व गणेश भक्तांकडून भावपूर्ण मनाने भक्तिमय वातावरणात घरगुती गणपतींचे विसर्जन करून बाप्पाना निरोप देण्यात आला.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर सर्व भक्तांना अंकुश घालावा लागला.गर्दी होऊ नये यासाठी मिरवणूक न काढता प्रत्येकांनी वैयक्तिक रित्या विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन हे अगदी साधेपणाने केल्याचे दिसत होते.यावेळी गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या,च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
दरवर्षी पेक्षा प्रत्येक घरातील काही मोजक्या व्यक्ती ह्या तोंडाला मास्क लावून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होता.लहान मुलांसहित महिलाही उपस्थित होत्या.काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी प्रमाणेच यंदाही पोलीस बंदोबस्त होता.

No comments:

Post a Comment