चंदगड, आजरा, गडडिंग्लज तालुक्यामध्ये तात्काळ एन. डी. आर. एफची तुकडी मिळावी- संग्रामसिंह कुपेकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2020

चंदगड, आजरा, गडडिंग्लज तालुक्यामध्ये तात्काळ एन. डी. आर. एफची तुकडी मिळावी- संग्रामसिंह कुपेकर यांची मागणी


संग्रामसिंह कुपेकर
चंदगड / प्रतिनिधी
      चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्याममधील सर्व प्रकल्प 100% भरून वाहत आहेत. आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्प 80% भरलेला आहे. तिन्ही तालुक्यातील हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. सध्यास्थिती अनेक गावात पुराचे पाणी शिरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.सन 2019 च्या पुराचा अनुभव घेता चंदगड,गडहिंग्लज, आजरा तालुक्याचा कोल्हापूरशी 13 दिवस संपर्क तुटला होता त्यामुळे शासनाची कोणतीही मदत उपलब्ध होऊ शकली नाही याकरिता खबरदारी म्हणून चंदगड ,गडहिंग्लज, आजरा तालुक्यासाठी राष्ट्रीय अनुक्रिया बल ( एन.डी.आर.एफ) ची तुकडी पाठविण्यात यावी अशी मागणी संग्रामसिंह कुपेकर ( शिवसेना संघटक चंदगड विधानसभा मतदार संघ) यांनी सतेज उर्फ बंटी पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्याकडे मागणी केली आहे. तात्काळ यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री यांच्याकडून मिळाल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment