कोल्हापूर येथील ईएसआय हॉस्पिटलला कोरोनाच्या उपचारासाठी २२लाखांचा निधी देणार - खासदार संभाजीराजे - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2020

कोल्हापूर येथील ईएसआय हॉस्पिटलला कोरोनाच्या उपचारासाठी २२लाखांचा निधी देणार - खासदार संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर / प्रतिनिधी  
     कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलची संख्या अपुरी पडत आहेत. यासाठी कोल्हापूर येथे कामगारांसाठीच्या असलेल्या व काही प्रमाणात बंद अवस्थेत असलेल्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा देण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे प्रयत्नशिल आहेत. याबाबत नुकतीच त्यांनी केंद्रीय कामगार कल्याण मंत्री संतोष कुमार गंगवाल यांची भेट घेतली. यावेळी खासदार निधीमधून २२ लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी खास. संभाजीराजे यांनी दाखवली.  खास. संभाजीराजे यांनी कोल्हापूरमध्ये कामगारांसाठीचे हॉस्पिटल बंद आहे. या ठिकाणी ५०० बेडची व्यवस्था आहे. काही प्रमाणात डॉक्टर असतात. पण कोरोना रुग्णांना या रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. काही अत्यावश्यक उपकरणांची कमतरता आहे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणांच्या खरेदीकरिता खासदार निधी मधून खर्च करण्यात यावा, असेही खा. संभाजीराजे यांनी मंत्री गंगवाल यांना सांगितले. त्यावेळी सर्व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलवली. अत्यावश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून हे हॉस्पिटल करोना रुग्णांना खुले केले जाईल असे यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment