संत गजानन शिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ, उस्फुर्त प्रतिसाद, आठ ठिकाणी मार्गदर्शन केंद्राची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2020

संत गजानन शिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ, उस्फुर्त प्रतिसाद, आठ ठिकाणी मार्गदर्शन केंद्राची स्थापना

दौलत हलकर्णी / हलकर्णी
           येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात शैक्षणिक वर्षे 2020-21 साठीच्या प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. यासाठी  विद्यार्थाकडून चागंल प्रतिसाद मिळत असून  ज्या विद्याशाखेसाठी प्रवेश उशीराने होणार आहे तेथे तात्पुरती प्रवेश देण्यात येते असल्याची माहिती संस्थाध्यक्ष डाॅ.आण्णासाहेब चव्हाण यानी दिली.
      संस्थेच्या पाँलिटेक्निक, डि. एम. एल. टी., नर्सिंग , पॅरामेडीकल, डि. एल. एड., डि. फार्मसी, ज्ञानसागर विद्यानिकेतन, दुरशिक्षण विभागातील डि. एल. टी., पदव्युत्तर विभागाच्या कोर्सेस साठी प्रवेशप्रक्रिया उस्फुर्तपणे सुरु आहे तर बी.फार्मसी, बी.टेक, बी. ए. एम. एस. च्या कक्षेत चौकशी व तात्पुरती प्रवेशप्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यात येत आहे. अंतिम मुदतीच्या आत प्रवेश मिळावा यासाठी निपाणी, मुदाळतिट्टा, कोवाड,
चंदगड, आजरा, दोडामार्ग, महागाव व हसुरवाडी कँपस येथील केंद्रामध्ये विद्यार्थाना मार्गदर्शन व प्रवेश केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर विद्यार्थाना कागदोपत्र जमवाजमव करण्यात अडचण येत असल्याने शासनाने पाँलिटेक्निक,डी.एम.एल.टी.,डी.फार्मसीचे मुदत 4 सप्टेबंर पर्यत वाढवला आहे.
     या समुहाच्या शैक्षणिक  कार्याची दखल घेत एम. एस. बी. टी. ई. ने येथील  पाँलिटेक्निकला सलग नऊ वर्षे सर्वोत्कृष्ट श्रेणी दिला तर राष्ट्रीय स्तरावरील एन. बी. ए. चा मानाकंन मिळाला आहे. बी.टेकला व हाँस्पिटलला एन. ए. बी. एच. मानाकंनाबरोबर इतर अनेक राज्यस्तरीय  पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. येथे प्रवेशीत विद्यार्थाना शासनाच्या सर्व सोई सवलती ,प्लेसमेंट ,शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध असणार आहे.दर्जेदार शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याना नोकरी मिळावी यासाठी संस्थेचा नेहमीच धडपड असते. आजपर्यंत देश विदेशातील नामाकिंत कंपनीत हाँस्पिटल मध्ये प्लेसमेंट उपलब्ध करुन हजारो विद्यार्थाचे करिअर घडवला आहे.
     तरी इच्छुक विद्यार्थानी मुदतीच्या आत आवश्यक कागदोपत्रासह येऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन विश्वस्त यशवंत चव्हाण व संजय चव्हाण यानी केला आहे.


No comments:

Post a Comment