कालकुंद्री विद्यालयाची ज्योती जाधव दहावीमध्ये विद्यालयात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

कालकुंद्री विद्यालयाची ज्योती जाधव दहावीमध्ये विद्यालयात प्रथम

ज्योती जाधव               राजश्री पाटील            आकांक्षा मुंगुरकर
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाची इयत्ता परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा या वर्षीही कायम राहिली आहे. ज्योती ओमाना जाधव  हीने ९३.२० टक्के गुणांसह शाळेत प्रथम तर केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला. याशिवाय राजश्री गुंडू पाटील ८९.२० टक्के, आकांक्षा विठोबा मुंगुरकर ८८.८०,  तनूजा विष्णू कोकीतकर ८८.२०, प्राची मारूती माडूळकर ८७.४० टक्के  यांनी क्रमांक पटकावले. सर्व विद्यार्थ्यांना माजी. मुख्याध्यापक सी.बी. निर्मळकर,  मुख्याध्यापक सुभाष बेळगांकर वर्गशिक्षक  ई.एल. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले . सर्व विद्यार्थ्यांचे शाळा समिती अध्यक्ष अॅड एस आर पाटील शाळा व्य. समिती अध्यक्ष गजानन गा. पाटील व सदस्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment