नागनाथ हायस्कुल नागरदळेचे दहावी परिक्षेत १०० टक्के यश - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

नागनाथ हायस्कुल नागरदळेचे दहावी परिक्षेत १०० टक्के यश

ज्वाला पाटील              अनुजा कोकितकर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
           नागरदळे  (ता. चंदगड) येथील नागनाथ हायस्कुलने दहावी परीक्षेतील आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत सर्वसमावेशक १०० टक्के यश प्राप्त केले. विद्यालयाच्या विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यानी  ७४ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. कु. ज्वाला पुंडलिक पाटील व अनुजा रवींद्र कोकितकर या दोन विद्यार्थिनी ९३.८० टक्के गुणांसह संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. अपेक्षित मष्णू पाटील ९१.२० द्वितीय, श्वेता मारुती मनगुतकर ८९.८० तृतीय, याशिवाय प्रतीक्षा मनोहर पाटील ८९.६०, श्रेया विठ्ठल होण्याळकर ८८.६०, श्रेयश मुकुंद होण्याळकर ८४.८०,  गगन अशोक पाटील ८४.८०, संदेश सिद्धाप्पा पाटील ८२.२०, अनिकेत अजित पाटील ८२.२०, प्रकाश केशव कोकितकर ८२, नीलम परशराम मुरकुटे ८१.६० टक्के यांनी अनुक्रमे यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक वाय. व्ही. कांबळे, शिक्षक ए. एस. मनुरकर, व्ही. बी. होन्याळकर, ए. व्ही. पाटील, पि. के. बोरगावकर, के. टी. कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment