हडलगे येथील दिव्यांग नातीच्या विनंतीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला मान, १०२ वर्षीय वृद्धेवर घरातच उपचारला परवानगी - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

हडलगे येथील दिव्यांग नातीच्या विनंतीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला मान, १०२ वर्षीय वृद्धेवर घरातच उपचारला परवानगी

हडलगे येथे प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसिलदार दिनेश पारगे संबधीत कुटुंबीयाना भेट दिली.
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
      हडलगे ( ता. गडहिंग्लज ) येथे आई - वडिलासह १०२ वर्षाच्या आजीला कोरोणाची लागण झाली आहे. आई वडीलाना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले आहे. प्रशासनाकडून आजीलाही कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न चालू झाले. पण दिव्यांग असणाऱ्या या नातीने थेट जिल्हाधिकारी दौलत देसाई याना फोन करून सविस्तर माहिती सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्वरीत आदेश काढत त्या आजिबाई घरोच  कॉरंटाईन करून उपचार करण्याचे आदेश दिले .
    येथील दौलतमधील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आला . त्यामूळे घरातील पत्नी, दोन मूली व १०२ वर्षाच्या आजीना संस्थात्मक विलगी करणाचा प्रशासनाने प्रयत्न चालवला. पण या मुलीचे आईवडील कोविड सेंटरला दाखल आहेत. यामूळे घरी जनावारे  व आजीची व्यवस्था कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासन मात्र सर्वाना कॉरंटाईन करण्यासाठी प्रयत्नशील होते. शेवटी या विव्यांग मुलीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मिटींग मध्ये असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यानी वॉट्स अपवर माहिती देण्यास सांगीतली. त्या मुलीने घरची अडचण, जनावारांचा प्रश्न, आजीचा प्रश्न सविस्तर कथन केला. याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तात्काळ तालूका प्रशासनाला सूचना दिल्या. प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे यांनी मुंगरवाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी पी. व्ही. खराडे, पर्यवेक्षक देवानंद तानवडे, परिचारिका ए. वाय. नाईक यानी हडलगे गावाला भेट देऊन उपचार चालू केले. या ठिकाणी मंडल अधिकारी प्राची येसरे, कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत कमिटी, पोलिस पाटील आदि लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी दाखवलेल्या समयसूचकता व निर्णय क्षमतेची चर्चा परिसरात चालू आहे.




No comments:

Post a Comment