महिपाळगड वनव्यवस्थापन समिती व वन विभाग पाटणेच्या संयुक्त विद्यमाने एक हजार वुक्षाचे रोपण - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

महिपाळगड वनव्यवस्थापन समिती व वन विभाग पाटणेच्या संयुक्त विद्यमाने एक हजार वुक्षाचे रोपण

महिपाळगड (ता. चंदगड) येथे वृक्षारोपन करताना ग्रामस्थ.
चंदगड / प्रतिनिधी
      चंदगड तालुक्यातील वनव्यवस्थापन समिती महिपाळगङ  व पाटणे  वन विभाग याच्या वतीने पर्यावरण पूरक 1000 वुक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. रमेश भोसलॆ होते   वनव्यवस्थापन समितीचे सचिव  सुभाष बाबाजी भोसलॆ  यानी  प्रास्ताविक व स्वागत केले  प्रमुख पाहुणे म्हणून  वनपाल  ए. डी. शिंदे कारवे  व माजी सरपंच  तुकाराम मोरे  हे उपस्थित होते वनरक्षक एस् . एस्.  जितकर यांनी  शास्त्रीय पद्धतीने  रोपांची लागवड  व संवर्धन  कसे करायचे याबद्दल  माहिती दिली  वनरक्षक  एल. टी. पाटील  कामेवाडी व दिपक कदम कारवे ,लहु पाटील  यानी ग्रामस्थांचे गट करून  कामाची विभागणी  व नियोजन  केले  वनव्यवस्थापन समिती  व ग्रामस्थांनी केलेल्या  श्रमदानाचे  वनपाल  ए. डी .शिंदे यांनी  आभार मानले  वैजनाथ कदम , सचिन विठ्ठल  भोसलॆ , भरत भोसलॆ यांचे विशेष सहकार्य मिळाले 40पुरुष  20महिला व मुले  यानी रोप लागवड  करण्यास मदत  केली.



No comments:

Post a Comment