कोवाडमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा पूजनाने व आरतीने आनंदोत्सव साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

कोवाडमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा पूजनाने व आरतीने आनंदोत्सव साजरा

प्रभू रामचंद्रांची प्रतिमा पूजन व आरती करताना ग्रामस्थ.

कोवाड / सी एल वृत्तसेवा
 श्री राम जन्मभूमीवर ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमीपूजन आणि पायाभरणी समारंभ होत आहे. या मंगलमय क्षणाचे औचित्य साधून कोवाड येथे राम मंदिर निर्माणासाठी आरती करून व प्रतिमा पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तसेच धार्मिक कार्यक्रम घेवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 चंदगड तालुक्यातील कर्यात भागाला प्रभू रामचंद्रांची पांढरी म्हणून ओळखले जाते कोवाड याठिकाणी श्री रामाचे मोठे मंदिर असून विजया दशमीला मोठा उत्सव साजरा करण्यात येत असतो. प्रभू रामांची जन्मभूमी अयोध्या नगरीत  श्री राम मंदिर पायाभरणी कार्यक्रमानिमित्त याठिकाणी श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंत्रोच्चार, रामरक्षा तसेच भजन करुन हा मंगलमय सोहळा साजरा करण्यात आला. गावातील राम मंदिरात महाप्रसाद नैवद्य दाखवून मंदिर निर्माणासाठी प्राथना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मास्कचा वापर करून व सामाजिक अंतर राखून हा सोहळा संपन्न झाला.यावेळी आपाजी वांद्रे सह उपस्थितांनी श्रीरामाची आरती, रामरक्षा, ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्रांचा उच्चार केला.त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सायंकाळी मंदिर परिसरात दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी गौरव नाईक,कल्लापा वांद्रे,पुंडलिक चोपडे,डॉ.रमाकांत जोशी,वसंत वांद्रे,लक्ष्मण आडाव,सुरेश वांद्रे,अरुण सुर्वे,देवदास कुंभार,रामा वांद्रे,लक्ष्मण मनवाडकर,रामा यादव,गुंडू तेली,शशिकांत कोरी,अमोल राजगोलकर,शिवानंद अंगडी, आदींसह भजणी मंडळ, समस्त गामस्त मंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment