कुदनूर-कालकुंद्री मार्गावर ओढ़याचे पाणी, कुदनुरची पाईपलाईन वाहून गेली - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2020

कुदनूर-कालकुंद्री मार्गावर ओढ़याचे पाणी, कुदनुरची पाईपलाईन वाहून गेली

कुदनूर-कालकुंद्री मार्गावर आलेले ओढ़याचे पाणी
कागणी : सी एल वृत्तसेवा
 संततधार पावसामुळे किटवाड लघु पाठबंधारा क्र. २  ओव्हरफ्लो झाला आहे.  यामुळे कुदनूर गावानजीक असलेल्या ओढ्याला नदीचे रूप आल्याने कुदनूर - कालकुंद्री या मार्गावरून पाणी वाहत आहे.  वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. कुदनूर परीसरातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. ओढ्याच्या आसपासचे पूर्ण शिवार पाण्याखाली आले आहे. 
कालकुंद्रीकडून कुदनूरकडे जाणाऱ्या मार्गावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या एका बाजुचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे तेथून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. 
                                कुदनुरची पाईपलाईन गेली वाहून
किटवाड लघु पाटबंधारे तलाव क्र. २ येथून जॅकवेलमार्फत कुदनूर गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तलाव क्र. २ ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओढ्यातून पाणीपुरवठा करण्यात आलेली पाईपलाईन वाहून गेली आहे. त्यामुळे कुदनूर गावाचा पाणीपुरवठा पाईपलाईन दुरूस्त होईपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment