कालकुंद्री / सी एल वृत्तसेवा
कोरोना संसर्गामुळे यावर्षी पंधरा आगस्ट च्या सर्व ग्रामसभा रद्द करण्यात आल्यामुळे विविध कमिट्यांच्या निवडी रखडल्या आहेत. तथापि कालकुंद्री (ता. चंदगड) येथील तंटामुक्त कमिटीची बैठक होऊन जुन्या कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. यात अध्यक्षपदी अशोक ऊर्फ भागोजी तुकाराम पाटील यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली असून परशराम यल्लाप्पा पाटील हे नवे उपाध्यक्ष झाले आहेत.
जाहिरात
उर्वरित कमिटी पुढीलप्रमाणे शिवाजी आप्पाजी कोकितकर, मनोहर म. कोकितकर, कल्लापा रा. जोशी, गजानन गा. पाटील, भरत बाबू पाटील, नारायण अ. पाटील, नारायण बाबू पाटील, संतोष रा. कांबळे, संजय ल. कांबळे, सिराज खु. मुल्ला, मारुती शं. पाटील, गुरुनाथ गुं. कांबळे, अमोल कृष्णा कोल्हे, सौ. सुधा सुभाष पाटील, सौ. मनिषा जयवंत पाटील, ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून प्रशासक बी एम कांबळे, पोलीस प्रतिनिधी सहाय्यक फौजदार हणमंत नाईक तर सचिवपदी पोलीस पाटील सौ संगीता कोळी यांची निवड करण्यात आली. सर्व कमिटीचे ग्रामविकास अधिकारी व्ही बी भोगण, मावळते सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच सुरेश नाईक आदींनी स्वागत केले.
जाहिरात
जाहिरात
No comments:
Post a Comment