चंदगड / प्रतिनिधी
काही दिवसा पासून दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा कळपाचे रविवार रोजी चंदगड तालुक्यात आगमन झाले असून हत्तीच्या कळपा कडून तालुक्यातील हेरे खा.गुडवळे गावातील शेतकऱ्याचे भात, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे वनविभाग चंदगडचे वनक्षेत्रपाल डी.जी.राक्षे ,वनपाल डी.आर. निकम डी.जी.पाटील, वनरक्षक श्रीमती खोत व टीव्ही शिंदे यांनी बुधवारी रोजी हेरे खालसा गुडवळे येथे जाऊन शेतकऱ्याचे पिकांची पाहणी केली.
जाहिरात
जाहिरात
मौजे हेरे येथील संजय पेडणेकर सदानंद सावंत यांचे ऊस पिकाचे हत्ती कळपा कडून साधारणपणे 25 गुंठे क्षेत्राचे खाऊन मोडतोड करुन नुकसान केले आहे. खालचा गुडवळे येथील मारुती गावडे यांचे घराजवळील शेतात हत्ती कळपाने सोमवारी रात्री ऊस व भात पिकाचे 15 गुंठे क्षेत्रावरील नुकसान केले आहे. तसेच श्रीमती जानकीबाई गावडे यांचे भात पिकाचे नुकसान केले आहे. झालेल्या सर्व सानीची पाहणी वन विभागाकडून करण्यात आली. आहे वनविभागाचे कर्मचारी हत्तीच्या मार्गाचा वावर असल्याच्या भागात गस्त घालून शोध घेत आहेत. शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी असे वन विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे. हत्तीचा कळपामध्ये लहान पिल्लू असल्याने कळप आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी हत्तीच्या हलचाली बाबत शेत शिवारात दिसून आल्यास त्वरित वनविभागाला त्वरित संपर्क साधावा असे अवहान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment