चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय ढेरे,उपाध्यक्षपदी सुरेश सावंत यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2020

चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय ढेरे,उपाध्यक्षपदी सुरेश सावंत यांची निवड

संजय ढेरे                                        सुरेश सावंत
चंदगड / प्रतिनिधी
     चंदगड तालुका पंचायत स्तरावरील सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संंजय धोंडिबा ढेरे यांची तर उपाध्यक्षपदी सूरेश महादेव सावंत यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी .के.आर कोळी होते .अध्यक्षपदासाठी संजय ढेरे यांचे नांव विलास शंकर पाटील यांनी तर उपाध्यक्षपदी सूरेश सावंत याचे नाव पांडूरंग मेंगाणे यानी सुचविले.त्याला उत्तम  भोसले व बसवाणी शिरगांव यानी अनुमोदन दिले .यावेळी शाखा अध्यक्षपदी पांडुरंग मेंगाणे यांचीही निवड करण्यात आली.यावेळी संचालक  सोनाप्पा कोकीतकर, सुनितादेवी पाटील,सूरेखा नाईक,सुनिल कुंभार , दत्तु पाटील,कबीरदास भुरके, मधुकर नागरगोजे, दत्ताराम कांवळे, शंकर मनवाडकर, ईश्वर पाटील, नामदेव चौगुले, सहदेव गावडे, राजाराम जोशी, प्रवीण साळुंखे, विजय कांबळे यासह संस्था कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment