|
कोवाड (ता. चंदगड) येथे गणेशभक्त घरगुती गणेशमुर्ती आणताना. |
सी.
एल. वृत्तसेवा, चंदगड
`गणपती बाप्पा
मोरया` टाळ मृदंग व ढोल, ताशांच्या गजरात तालुक्यात आज सर्वत्र सकाळपासून घरगुती व सार्वजनिक गणरायांचे भक्तीमय वातावरणात आगमन झाले. गेल्यावर्षी महापुराने तर यावर्षी कोरोनाने
थैमान घातल्याने लोकांच्यामध्ये नेहमीचा उत्साह दिसत नव्हता. आज दिवसभर काही
ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता.
|
कोवाड (ता. चंदगड) येथे घरगुती गणेशमुर्ती घरी नेताना संजय पाटील व इतर. |
गेल्या
महिनाभरापासून सार्वजनिक तर तीन-चार दिवसापासून घरगुती गणपतीसाठी मकर करण्यात
अबालवृद्ध मग्न होते. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने केला जात असल्याने
याला जास्त महत्व आहे. गणेशमूर्ती नेण्यासाठी विविध
गावातील कुंभारवाडे व मुर्ती बनविणाऱ्याच्याकडे लोकांनी एकच गर्दी दिसत होती. गणेशोत्सवासाठी वर्षभर बाहेरगावी असलेले चाकरमानी गणपतीला आवर्जून गावी
येतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने
अनेकांनी गावी येणे टाळले.
आज
सकाळपासून कोणी चालत, कोणी
मोटरसायकलने, तर कोणी स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या सोयीने गणेशमूर्ती नेत होते. काही गावामध्ये गावामध्येच गणेशमूर्ती मिळत असल्याने
सुतारगल्ली व कुंभारवाड्यात आज दिवसभर गर्दी होती. गणपतीसाठी
मकर करण्यासाठी रात्र जागवली गेली. विद्युत रोषणाई, हार, वेली, फुलदाण्या, गणेशाचे आसन, फेटा
तोरणे, उपरणे,
महावस्त्र, टोपी, झुरमुळ्या, कागदी पताका या गोष्टी मकराच्या सजावटीसाठी वापरल्या गेल्या आहेत.
शाळकरी मुलांना कोरोनामुळे सुट्टी असल्यामुळे त्यांनीही अनेक दिवसापासून मकर
करण्याचे नियोजन केले होते. घरगुती गणेशाच्या आगमनाची तयारी गेल्या दोन दिवसापासून
तर गेले महिनाभर सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मंडपाची तयारी करत होते. त्याला आज
पूर्णत्व आले. गणेशाच्या आगमनाने घराघरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. आजकाल
सर्वच कामांना मूहूर्त बघितला जातो. त्याचप्रमाणे
गपणतीही मुहुर्तावर नेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती. गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र वातावरण गणेशमय झाले होते.
No comments:
Post a Comment