वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १८ (बिनविषारी साप) वाळा / Worm Snak/ Blind Snake - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १८ (बिनविषारी साप) वाळा / Worm Snak/ Blind Snake

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १८ (बिनविषारी साप) वाळा / Worm Snak/ Blind Snake
 वाळा : Worm Snake /Blind Snake (Ramphotyphlops braminus)

वाळा हा भारतातील सर्वात छोट्या आकाराचा बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने पाहणाऱ्या प्रत्येकाचा अंदाज चूकतो. पण याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी वळणे घेत सळसळताना  दिसतो.
   वाळा साप लालसर लपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग किंचित फिकट असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे आणि शेपूट टोकदार असते. वाळ्याची लांबी  १२ ते जास्तीत जास्त २३ सें.मी. असते.

आंधळा असल्याने महाराष्ट्रात याला आंधळा किंवा अंधासाप म्हणतात. दानवं, सोमनाथ अशीही त्याची नावे आहेत. गोव्यात याला 'टिल्यो' म्हणतात.
वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती डोक्याने उकरुन त्यात राहतो. भारतामध्ये वाळा विशेषतः पावसाळ्यात जमिनीवर  वावरतो, इतर वेळी जमिनीखाली दीर्घकाळ पडून राहतो. याचे प्रजनन अंड्यांद्वारे होते. मादी एका वेळी ३-७ तांदळाच्या आकाराची अंडी घालते.  मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या हे वाळा सापाचे खाद्य आहे.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment