अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याचा 2020-21च्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रतिपादन कार्यक्रम दोन ऑक्टोबरला - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2020

अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याचा 2020-21च्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रतिपादन कार्यक्रम दोन ऑक्टोबरला

दौलत हलकर्णी

    हलकर्णी (ता. चंदगड ) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा 2020-21च्या गळीत हंगामासाठी बॉयलर प्रतिपादन महात्मा गांधी याच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोंबर 2020 रोजी करण्याचे निश्चित केले आहे. साखर कारखाण्याने मागील हंगाम चाचणी स्वरूपात घेतला असून मागील हंगामामध्ये आलेल्या मशिनिरी दुरुस्ती देखभालीमध्ये  आढळलेल्या अडचणींचा विचार व्यवस्थापनाने हंगाम 2020 -21 करिता कामे अंतिम टप्प्यात असून सर्व मशिनिरींची ट्रायल घेण्याचे काम सुरू असल्याची माहीती व्यवस्थापणामार्फत देण्यात आली आहे.
               कारखाणा मशिनिरी सर्व दृष्टीने सक्षम करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कारखान्याकडे आवश्यक सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करून लवकर सदरची यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात हजर होत आहे. उसाच्या नोंदीप्रमाणे परिपक्व उसाची तोड करण्याचे नियोजन कारखाना पूर्ण क्षमतेने तोड करण्याचे नियोजण व्यवस्थणामार्फत करण्यात आले आहे. आता या हंगामात कोणतीही अडचण येणार नाही याबाबत ती सर्व काळजी व्यवस्थापनाने घेतली आहे. हंगामामध्ये पाच ते सहा लाख ऊस गाळप करण्याचे व्यवस्थापनाने उद्दिष्ट ठेवले आहे.
         अथर्व-दौलतवर प्रेम करणा-या सर्व शेतकरी बंधूनी दौलतची उत्तरोत्तर प्रगती व्हावी या हेतूने प्रेरित होऊन आपला पिकवलेला संपूर्ण उस दौलतकडेच पाठवून सहकार्य करण्याचे आव्हान अथर्व-दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment