![]() |
शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना विद्यार्थी. |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंदगड तालुका ,इचलकरंजी शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० चे शैक्षणिक शुल्कामध्ये ३०% कपात करण्यात यावी , नोंदणी करत असताना एकूण शुल्काच्या कमाल १५% शुल्कासह प्रवेश द्यावा व उर्वरित शुल्क ४ टप्प्यात आकारले जावेे , तसेच अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठाने तात्काळ परत करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा या व अन्य मागण्यांचे निवेदन आमदार राजेश पाटील यांना अभाविपच्या वतीने देण्यात आले. या वेळी विनायक गावडे, ऋतिक नांगरे, अमृत भिंगुडे, किरण पोवार, अनिकेत भाग्यवंत, गणेश गावडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment