ग्रामपंचायत अडकूर मार्फत ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम व शक्तीवर्धक काढ्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2020

ग्रामपंचायत अडकूर मार्फत ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम व शक्तीवर्धक काढ्याचे वाटप

अडकूर येथे ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करताना मान्यवर.
अडकूर / प्रतिनिधी
           ग्रुप ग्रामपंचायत अडकूर- मलगेवाडी व आशा, अंगणवाडी सेविका अडकूर यांचेकडून सर्व ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम -३० व कणेरी मठाकडून दिलेल्या शक्तीवर्धक काढ्याचे वाटप करण्यात आले.
         ग्रामस्थांना २००० हजार बॉटलमधून काढा बीडीओ श्री. जाधव, वैद्यकिय आधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, सरपंच श्रीमती यशोधा कांबळे आदिंच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच अनिल कांबळे, सदस्य सुनिल देसाई, राजाराम घोरपडे, बंडू चंदगडकर, सौ. सुजाता इंगवले, उषा आर्दाळकर, दिपाली परिट, सुमन शिवनगेकर, कृषी अधिकारी किरण पाटील, एस. के. हरेर, आर .व्ही. देसाई, ग्रामसेवक  श्री. सोनार ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ सोशल डिस्टन्स ठेवुन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment