कोवाड येथे अभय पतसंस्थेतून १२ लाख ४५ हजारांचे सोने लंपास, परिसरात खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2020

कोवाड येथे अभय पतसंस्थेतून १२ लाख ४५ हजारांचे सोने लंपास, परिसरात खळबळ

कोवाड (ता. चंदगड) येथील पतसंस्थेची पाहणी करताना पोलिस.
कोवाड / (प्रतिनिधी)
           कोवाडसह चंदगड तालुक्यात चालू असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत कोवाड (ता. चंदगड) येथील अभय सहकारी पतसंस्थेच्या लोखंडी शटरचे दरवाजे अज्ञाता नी तोडून सोनेतारण घेतलेल्या कर्जदारांचे ७५ तोळे २२० मि .ली वजनाचे १२ लाख ४५ हजार ७२० रूपये किमतीचे सोने चोरण्यात आल्याची फिर्याद तानाजी भरमाना पाटील रा . मांडेदुर्ग यानी कोवाड पोलिसात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे . घटनास्थळी गडहिंग्लज उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले डि .वाय.एस .पी प्रशांत अमृतकर यानी भेट देऊन मार्गदर्शन केले .
    अधिक माहिती जशी ,येथील दुर्गामाता चौकातील हनुमान  दुध संस्थेच्या माडीवर अभय पतसंस्थेची शाखा आहे . कोवाडला लॉकडाऊन असत्याने दि .२ ते १२ सप्टेंबर पर्यंत शाखा बंद होती .आज  संस्था चालू करण्यासाठी आले असताना चोरीचा प्रकार लक्षात आला . चोरट्यानी दोन दरवाजांचे कुलूप तोडून संस्थेच्या कॅशिअर रुममध्ये प्रवेश केला . येथील  लॉकर गॅस कटरने तोडून लॉकरमध्ये कर्जदारांचे ठेवलेले ७५ तोळे २२० मि ली . वजनाचे सोने लंपास केले . याची किंमत १२ लाख ४५ हजार ७२० इतकी होते . कर्जदाराचे सोने चोरटयानी लंपास केल्याने चंदगड तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे .
या संदर्भात कोवाड पोलिसात भा . दं.वि.स कलम 454.457.380नुसार अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद केला आहे.  या घटनेचा तपास पो . नि अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली , . पीएस. आय हणमंत नाईक , पो . कॉ .संतोष साबळे करत आहेत.


No comments:

Post a Comment