कोवाड महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2020

कोवाड महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

कोवाड महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्ष्यानिमित्य नामफलकाचे पूजन करताना मान्यवर

कोवाड सी एल वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यंदा रौप्य महोत्सवी  वर्षात  पदार्पण करत आहे.यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सामाजिक अंतर ठेवून संस्थाध्यक्ष डॉक्टर ए एस जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली साध्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न  करण्यात आला.

         प्रारंभी प्राचार्य डॉ.व्ही आर पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या फलकाचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित  मान्यवरांचे मनोगते झाली प्रास्ताविक डॉ दीपक पाटील यांनी केले. यावेळी सचिव मा एम व्ही पाटील ,सहसचिव शाहू फर्नांडिस, संचालक आप्पा वांद्रे, प्रगतशील शेतकरी नरसिंग बाचुळकर यांनी संस्थेच्या वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय सेवक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे डॉ व्ही आर पाटील यांनी आपल्या प्राचार्य मनोगतातून सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन  सांस्कृतिक विभागाने केले होते. आभार डॉ. व्ही. के. दळवी यांनी मानले.

No comments:

Post a Comment