श्रमदानातून युवकांनी भरले रस्त्यातील खड्डे, वाहनधारकातून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2020

श्रमदानातून युवकांनी भरले रस्त्यातील खड्डे, वाहनधारकातून समाधान

तेऊरवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावरील खड्डे बुजवताना कृष्णा, संतोष, संस्कार, कार्तिक.

तेऊरवाडी - सी. एल. वृतसेवा

         नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील नविन वसाहतीच्या तळ्याजवळ रस्त्यावर दरवर्षीच मोठे खड्डे पडतात. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असले तरी तेऊरवाडीच्या यूवकानी मात्र हे खड्डे स्वतः श्रमदान करून बुजवल्याने वाहनधारकाकड्न समाधान व्यक्त केले जात आहे.

        कोवाड-तेऊरवाडी रस्त्यावर  तलावाजवळ सखल भागात पाणी साचल्याने रस्ता खराब झाला आहे. येथे मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. समोरच मोठा चढाव असल्याने वाहनधारकाना वाहनाची गती वाढवावी लागते. मात्र या खडयामूळे वाहनाचा वेग वाढवणे अडचणीचे तर ठरतच आहे पण वाहनांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलेल्या या खड्यांकडे मात्र तेऊरवाडीच्या युवकांनी लक्ष दिले. हातात फावडे बुट्टी घेऊन येथील कृष्णा पाटील , संतोष कुंभार, संस्कार पाटील, कार्तिक कोकितकर, युवराज कोकितकर, सिद्धार्थ लोहार या युवकानी खड्डे बुजवले .केवळ मोबाईलवर गेम खेळत न बसता प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या या युवकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment