सुळगा, सुरूते, बिजगर्णी येथे सोमवारी ऊस शास्त्रज्ञ साधणार शेतकऱ्यांशी संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2020

सुळगा, सुरूते, बिजगर्णी येथे सोमवारी ऊस शास्त्रज्ञ साधणार शेतकऱ्यांशी संवाद

सुरेश माने-पाटील

कागनी : सी. एल. वृत्तसेवा

       राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस शुगर्सतर्फे सुळगा, सुरूते, बिजगर्णी येथे ऊस उत्पादक शेतकरी व पुणे येथील व्हीएसआय चे माजी उस शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांचा संवाद कार्यक्रम सोमवारी दि. २१ रोजी आयोजित केल्याची माहिती हेमरसचे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. 

         हेमरस कडून ऊस उत्पादक आर्थिक साक्षरता अभियान सुरू आहे. या अंतर्गत सुळगा येथे सकाळी 10 वाजता, सुरुते येथे १२ वा.,  बिजगर्णी येथे दुपारी  ३ वा. हा कार्यक्रम होणार आहे. उस शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. ऊस उत्पादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हेमरसचे अधिकारी नामदेव पाटील, विठ्ठल सुतार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment