किटवाड धबधब्यात पडून एकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2020

किटवाड धबधब्यात पडून एकाचा मृत्यू

किटवाड धबधब्याचे रौद्र रूप.

कुदनुर : सी. एल. वृत्तसेवा

        किटवाड (ता. चंदगड) येथील धरणाच्या सांडव्यामुळे तयार झालेल्या धबधब्यात पडून चेन्नई येथील एकाचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती हा बेळगाव रेल्वे स्टेशन वरील ‌कर्मचारी असल्याचे समजते. बेळगाव रेल्वेतील आपल्या मित्रांसोबत तो पर्यटन स्थळवर आला होता. ही घटना २० सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनेची वर्दी किटवाडचे पोलीस पाटील ओमाना सुतार यांनी कोवाड पोलिसात दिली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

यासंदर्भात माहीती अशी -  महाकाय धबधब्यात पडून मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह प्रवाहाबरोबर वाहत खाली गेले, ते सायंकाळी आठ वाजता सापडले. पण अंधार व काटेरी झुडपांमुळे ते सकाळी काढण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत किटवाडने धरण व धबधबा पर्यटकांना ८ सप्टेंबर पासून बंद केला आहे. तसे सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तथापि याकडे दुर्लक्ष करून बेळगाव कर्नाटक मधून आलेल्या पर्यटकांना हे पर्यटन महागात पडले. धबधब्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या पंधरा ते वीस वर्षात ही पहिलीच घटना घडली आहे.




No comments:

Post a Comment