वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३८ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३८ : विषारी विरुद्ध बिनविषारी साप

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३८ :  विषारी विरुद्ध बिनविषारी साप

पोवळा VS काळतोंड्या
     विषारी- पोवळा / स्लेंडर कोरल स्नेक (slender Coral snake) VS  बिनविषारी- काळतोंड्या /ब्लॅक हेडेड स्नेक (black headed snake/ Dumeril black headed snake), 

विषारी आणि बिनविषारी साप ओळखता न आल्यामुळे विषारी साप समजून बिनविषारी सापांची नेहमी हत्या होते. बहुतांशी वेळेला साप मारल्यानंतर समजते की हा बिनविषारी आणि दुर्मीळ साप होता. अशा सापांची आणखी एक जोडी म्हणजे विषारी पोवळा आणि बिनविषारी काळतोंड्या
साप.
या सापांची वर्गवारी विषारी आणि बिनविषारी जोडीत केली असली तरी दोन्ही साप अति दुर्मिळ असे आहेत. त्यामुळे यांचा समावेश वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सुचि दोन मध्ये करून कायद्याने संरक्षण दिले आहे. या सापांना मारणेस पूर्णपणे मनाई आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
 हे दोन्ही साप आकारमानाने एक सारखे असले तरी काळतोंड्या सापाचे फक्त तोंड काळे असते. तर पोवळा सापाचे तोंड काळे व शेपटी जवळ दोन काळे आडवे पट्टे असतात. पोवळा साप विषारी असला तरी तो आकाराने फारच बारीक अंगकाठीचा असल्याने माणसाला सहजासहजी दंश करू शकत नाही. वरील पैकी कोणताही साप नजरेस पडल्यास त्याला न मारता शक्यतो त्याच्यावर लक्ष ठेवून परिसरातील सर्पमित्र किंवा सर्पतज्ञांना पाचारण करून जीवदान द्यावे. जेणेकरून आपल्या परिसरातील जैव विविधतेत त्याचा समावेश करता येतो.

(प्रस्तुत सापांच्या मालिकेतील भाग - २४ मध्ये काळतोंड्या तर भाग - २५ पोवळा सापाबद्दल अधिक माहिती दिली आहे. ती पुन्हा पहावी)

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२



No comments:

Post a Comment