माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमे वेळी घरोघरी तपासणी करताना आरोग्य सेविका. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
देवरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेचा शुभारंभ चंदगड पंचायत समिती सदस्य सौ. रुपाली खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. घरोघरी जाऊन सर्व कुटुंबांतील सदस्यांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या पथका पासून नागरिकांनी आरोग्याबाबतची कोणतीही माहिती लपवू नये असे आवाहन रूपा खांडेकर यांनी यावेळी केले. यावेळी तलाठी चंद्रकांत पाटील, पं. स. विस्तार अधिकारी ठोंबरे, माजी सरपंच दशरथ भोगण, पोलिस पाटील जयवंत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते भैरू खांडेकर, पुंडलिक कांबळे आदींसह आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment