माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी चंदगड मधील नागरिकांचा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी चंदगड मधील नागरिकांचा प्रतिसाद


चंदगड / प्रतिनिधी

          महाराष्ट्र शासनाकडून सुरु असलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी चंदगड मधील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम यशस्वी करणेसाठी प्रतिष्ठित नागरिक विजय नारायण टोपले, गजानन  ज्ञानोबा पिळणकर, जी. एस. पाटील, शिवाजीराव विठोबा पाटील याxनी नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर यांचेकडे मोहिमेस आर्थिक सहकार्य करणेसाठी धनादेश व रोख रक्कम सुपूर्द केली. यावेळी चंदगड उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्यासह  सर्व नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नगरअभियंता कर्मचारी उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी सचिन शिंदे यांनी मोहिमेस सहकार्य केलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment