तहसिल कार्यालयाला कोरोनाने गाठलेच, तहसिल कार्यालय पाच दिवस बंद, कामाशिवाय शासकीय कार्यालयात येणे टाळा - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2020

तहसिल कार्यालयाला कोरोनाने गाठलेच, तहसिल कार्यालय पाच दिवस बंद, कामाशिवाय शासकीय कार्यालयात येणे टाळा


चंदगड दि. 22

      कोरोनाचा प्रादुर्भाव आता शासकीय कार्यालयात झाला असून उपविभागिय कार्यालयासह चंदगड तहसिल कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे बुधवारपासून २३ सप्टेंबर पासून २७ सप्टेंबरपर्यंत तहसील कार्यालय बंद ठेवले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चंदगड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात शासकीय कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच मंगळवारच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यात तब्बल १३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर तालुक्यातील आतापर्यंत कोरोना बधितांची संख्या ८७१ वर गेली आहे. तर सध्या २०२ रुग्णांवर उपचार सूरु आहेत. तर दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनाने ३२ रुग्ण दगावले आहेत.No comments:

Post a Comment