चंदगडला चार पोलिसासह 25 रूग्ण पाॅझिटीव्ह, तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीच, प्रशासनाची दमछाक - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2020

चंदगडला चार पोलिसासह 25 रूग्ण पाॅझिटीव्ह, तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीच, प्रशासनाची दमछाक

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुक्यात आज पोलिस ठाण्यातील चार पोलिसासह कोरोनाच्या नवे २५रूग्ण  सापडले. आरोग्य विभागाच्या आजच्या अहवालानुसार चंदगड तालुक्यात  नवे पंचवीस  कोरोनाबाधित रुग्ण सापडले .चंदगड शहर 9,राजगोळी 4, बेळेभाट 3,नागनवाड़ी 2,किणी 2, कुदनूर 2, कागणी 1, वरगाव 1,सदावरवाड़ी 1

 गावातील रूग्णांचा  समावेश आहे.  तालुक्यात आजअखेर ८९६ पाॅझीटीव्ह रूग्ण सापडले आहेत.दरम्यान काल चंदगड चे तहसिलदार यांच्यासह कार्यालयातील अन्य चार जणांचे  अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे २७सप्टेंबर पर्यंत तहसिल कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील आतापर्यंत कोरोना बधितांची संख्या ८९६ वर गेली आहे. तर सध्या २०२ रुग्णांवर उपचार सूरु आहेत. तर दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनाने ३२ रुग्ण दगावले आहेत.

No comments:

Post a Comment