![]() |
चंदगड / सी. एल. न्यूज वृत्तसेवा
चंदगड शहरामध्ये होम आयसोलेशन केलेल्या प्रभाग क्र. १४ व प्रभाग क्र. ७ मधील कोरोनाबाधित रुग्णांची नगराध्यक्ष प्राची काणेकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक यांनी पाहणी केली. यावेळी रुग्णांची चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सोयी सुविधांबाबत चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी रुग्णांची चौकशी करून डिस्चार्ज नंतर घरातच क्वारंटाईन व्हावे, घराबाहेर पडू नये व काही गरज भासल्यास आपल्या प्रभागामधील नगरसेवक यांची मदत घ्यावी, अशा सुचना केल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या सुविधांबाबत चर्चा करीत त्यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment