चंदगड तालुका संंजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी प्रविण वाटंगी - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2020

चंदगड तालुका संंजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी प्रविण वाटंगी

प्रविण वाटंगी

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड  तालूका संंजय गांधी  निराधार योजनेच्या  अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते  प्रविण मल्लीकार्जून वाटंगी  यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई   यांनी निवडीचे पत्र दिले आहे. पालक मंत्री सतेज पाटील व आमदार राजेश पाटील यांच्या शिफारशीनुसार प्रविण वांटगी यांची निवड करण्यात आली आहे. या पदावर पूर्वी सूनिल काणेकर  हे अध्यक्ष म्हणून वर्षभर कार्यरत होते  यावेळी चंदगड तालुक्यातील आर्थिक दुर्बल योजना समिती वर सौ. संज्योती संतोष मळवीकर, कृष्णा कांबळे, सलीम मोमीन,रणधीर सुतार, गुंडू मेटकूपी, मारूती पाटील, माधव मंडलिक, अशोक मनवाडकर, सोमनाथ गवस यांची  सदस्यपदी  निवड करण्यात आली आहे.  सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते प्रविण वाटंगी  यांच्या निवडीने तालुक्यातील निराधारांना आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, आर्थिक दूर्बलासाठीच्या इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग व्यक्तीना लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नूतन अध्यक्ष श्री. वाटंगी यांनी सांगितले.
No comments:

Post a Comment