सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पुरोगामी शिक्षक संघटनेने कोरोना काळात केलेली मदत अमूल्य - सभापती ॲड. अनंत कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2020

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पुरोगामी शिक्षक संघटनेने कोरोना काळात केलेली मदत अमूल्य - सभापती ॲड. अनंत कांबळे

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड येथील कोवीड सेंटरला पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने वॉटर डिस्पेंसर प्रदान करण्यात आला . याप्रसंगी सभापती मा.अॅड . अनंत कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले .. सामाजिक ,शैक्षणिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पुरोगामी शिक्षक संघटनेचे कार्य खूपच प्रेरणादायी  असल्याचे गौरवोद्गार गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी काढले 

      कोवीड सेंटरवरील रूग्णांची गरम पाण्याची  गरज लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोविड सेंटरवर व कोल्हापूर शहरातील कोवीड सेंटरवर शिक्षकांच्या मदतनिधीतून 20  वाँटर डिस्पेन्सर वितरण केले असल्याची माहिती संघटनेचे चंदगड तालुका अध्यक्ष  रविंद्र साबळे यांनी मान्यवरांना दिली

      सभापती अँड.कांबळे  व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे  यांनी संघटनेला आभारपत्र देऊन या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या.       याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी एस एस सुभेदार ,आरोग्य अधिकारी आर के खोत, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे तसेच  राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा नेते गोविंद पाटील, जिल्हाध्यक्ष एस के पाटील, राज्य संघटक पी आर पाटील, चंदगड तालुका अध्यक्ष रवी साबळे , सरचिटणीस राम प्रभू, जयवंत देसाई ,राजाराम पोवार आदी पुरोगामी पदाधिकारी उपस्थित होते.






No comments:

Post a Comment