चंदगड येथील कोविड सेंटरला प्राथथमिक शिक्षक समितीच्या वतीने इन्व्हर्टर व अन्य साहित्याची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2020

चंदगड येथील कोविड सेंटरला प्राथथमिक शिक्षक समितीच्या वतीने इन्व्हर्टर व अन्य साहित्याची भेट

चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कोविड सेंटर चंदगड साठी उपयुक्त साहित्य तहसिलदार यांचेकडे सुपूर्त करताना शिक्षक समिती कार्यकर्ते.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        प्राथमिक शिक्षक समिती चंदगड च्या वतीने  कोवीड १९ सेंटर चंदगडला दोन इन्व्हर्टर , कोरोना पेशंट साठी इंजेक्शन   तहसीलदार विनोद रणवरे व आरोग्य अधिकारी डॉ आर के खोत यांचेकडे सुपूर्त करणेत आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ सुमन  सुभेदार ,शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील,  तालुकाध्यक्ष बाबुराव परीट, सरचिटणीस प्रशांत पाटील , धनाजी पाटील ,सुभाष चौगले, लक्ष्मण लाळगे, संजय ढेरे, विठ्ठल पिटुक, चंद्रकांत चिगरे, संतोष घवाळे,  मोहन नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षक समितीच्या कार्याचा आदर्श घेऊन इतर संस्था व संघटनानी कोविड सेंटर सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले.

No comments:

Post a Comment