![]() |
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण द्या, या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देताना. |
चंदगड / प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगित दिली आहे, त्यावर शासनाने तोडगा काढावा तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोवर कोणत्याही विभागात शासनाने नोकर भरती करू नये अशी मागणी आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.हालगी मोर्चा काढून तहसिलदार विनोद रणवरे याना निवेदन देण्यात आले. एक मराठा, लाख मराठा..! आरक्षण आमच्या हक्काचे..! अशा घोषणांनी आज चंदगड तहसील कार्यालय दणाणून सोडले.
![]() |
मोर्चात सहभागी झालेले मराठा समाजाचे तरुण. |
मराठा समाजाच्या अनेक मागण्या घेऊन शांततेत ५८ मूक मोर्चे काढले. त्यानंतर शासनाने मराठा आरक्षण दिलं. त्यातून मराठी मुलांच्या भविष्याचे अनेक प्रश्न मार्गी लागणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे मराठा समाजाचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने मराठा मुलांच्या भविष्याचे प्रश्न लक्षात घेत यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची भरती करू नये, शैक्षणिक सवलती कायम ठेवाव्यात, तामिळनाडूच्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदेशीर बदल करावेत तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढला अशी मागणी निवेदनातून केली आहे.
![]() |
सकल मराठा समाजाचे तरुण आरक्षणाबाबत आपले विचार मांडताना. |
मराठा समाजाला आर्थिक व सामाजिक मागास प्रवर्गातून आरक्षण मिळाले, मात्र ते टिकण्यासाठी संविधानाच्या अनुसूची ९ मध्ये दुरुस्ती कशी होईल, सुप्रीम कोर्टात यावर कसा फेरविचार होईल, यासाठी सर्व राजकीय पक्ष व राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षण कसं टिकवता येईल याबाबत आपण प्रयन्त करूयात असे मत प्रा. एस.एन पाटील यांनी मांडले.तर अड.संतोष मळवीकर यानी मराठा समाजातील यूवकानी
नोकरी न करता उद्योग धंदे उभारावेत,कर्मावर आपली वर्गवारी ठरते,जातीवर नाही .आपल्यावर जातीचा शिक्का मारला गेलाय,या जातीवादात न आडकता यूवकानी आपल्याला जमेल तो उद्योग करावा, शासनाने एक तर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा समान नागरी कायदा लागू करावा अशी मागणी केली.
यावेळी यावेळी माजी सभापती शांताराम पाटील प्रा.दीपक पाटील,, पिनु पाटील, पांडुरंग बेनके, संजय ढेरे,विष्णू गावडे,संदिप नांदवडेकर, संदेश आवडण, गोपाळ गावडे, एस.एन. पाटील, राज सुभेदार व मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment