चंदगड नगरपंचायतीकडून "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" अभियानांतर्गत कुटुंबाची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2020

चंदगड नगरपंचायतीकडून "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" अभियानांतर्गत कुटुंबाची तपासणी

माझे कुटुंब,माझी जबाबदारी" अभियानांतर्गत कुटुंबाची तपासणी करताना अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य सेवक ,चंदगड नगरपंचायत नगरसेवक 

चंदगड / प्रतिनिधी
              चंदगड नगर पंचायत कडून शहरातील प्नत्येक नागरिकांची "माझे कुटुंब,माझी माझी जबाबदारी अभियानांतर्गत अभियानाच्या तिसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. .कोवीड १९च्या या अभियानांतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.रोज प्रत्येक वाँँर्ड मध्ये बत्तीस घरांतील तपासणी होणार आहे, शासनाने ही प्रभावी मोहिम हाती घेतली आहे.
मोहिमेअंतर्गत नागरीकंची तपासणी करताना आरोग्य सेवक.
तपासणीसाठी येणार पथक ताप,सर्दी,खोकला, श्र्वासाचा त्रास होतो का याची तपासणी करून संमधीत कुटुंबातील सर्वांना उपाययोजना बाबत मार्गदर्शन व सहकार्य. करत आहे या अभियानांतर्गत शहरातील सर्वच कुटुंबाची काळजी घेतली जात आहे.गेली दोन दिवस शहरातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नगराध्यक्ष व शहरातील प्रत्येक नगरसेवक जबाबदारी पूर्वक नागरिकांना आह्वान करत आहेत.आज शहरातील नगरसेवक अनंद ऊर्फ बाळू हळदणकर, नगरसेविका सौ.अनुसया दाणी,नगरसेविका सौ.नेत्रदिपा कांबळे,अभिजित गुरबे यांनी आरोग्य पथकात सहभागी होवून वैयक्तिकरित्या आपल्या वाँर्ड मधील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे असे सांगितले. 

No comments:

Post a Comment