![]() |
वंदना वांद्रे सुनीता पाटील प्रगती निंबाळकर |
सकल मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या चंदगड तालुका महिला अध्यक्ष पदी कोवाड च्या वंदना वांद्रे तर उपाध्यक्ष पदी सुनीता पाटील यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदी आसगोळीच्या प्रगती निंबाळकर यांची निवड करण्यात आल्याचे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शोभा कोकितकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आगामी काळात मराठा समाजाच्या दृष्टीने संघटनात्मक कार्याच्या मजबुतीकरनासाठी वाडी,वस्ती,गाव ,शहर,तालुका,जिल्हा व राज्यात मराठा समाजासमोर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अध्यक्ष व कमिटी नेमणार असल्याचे यावेळी कोकितकर यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात कोरोना योध्या ची भूमिका बजावणाऱ्या कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गट प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या वंदना वांद्रे व आशा स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या सुनीता पाटील तर प्राथमिक आरोग्य केंद्र अडकुर मध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम पाहणाऱ्या प्रगती निंबाळकर यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. या रणरागिनींच्या निवडीने तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment