शिवशक्ती फिल्म प्रस्तुत नमुने (Back to School ) वेबसिरीज लवकर प्रदर्शित होणार - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2020

शिवशक्ती फिल्म प्रस्तुत नमुने (Back to School ) वेबसिरीज लवकर प्रदर्शित होणार

बॅक तू स्कूल सिरीज मधील टीम
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांनी केली उल्लेखनीय आणि लक्षवेधी अशी वेब सिरीज कोल्हापूर जिल्ह्यातील शिवशक्ती प्रोडक्शन नमुने बॅक टू स्कूल नावाची वेबसीरिज लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. 

          ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना घेऊन ही वेबसिरीज बनविण्यात आली आहे त्यासाठी वेब सिरीज चे लेखक आणि दिग्दर्शन कुदनुर गावचे सुपुत्र ईश्वर नारायण गवंडी त्याचबरोबर छायांकन राजगोळी गावचे सुपुत्र रामचंद्र कृष्णा लोहार आणि निर्माते संतोष उडणगे जिल्हा बेळगाव संकेश्वर अंकले चे सुपुत्रआणि सहनिर्माते  प्रथमेश बुगडे प्रथमेश लाइट्स गडहिग्लज त्याचबरोबर सहनिर्माते श्रीकांत गस्ती गायक किरण जाधव यांनी वेब सिरीज बनवण्यास महत्त्वाची भूमिका निभावली.

             नमुने बॅक टू स्कूल वेब सिरीज शालेय जीवनावर आणि एका उल्लेखनीय उद्देशातून बनवली आहे अर्थातच सर्वांनाच शालेय जीवन अतिशय प्रिय असते या वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा शाळेला जाण्याची इच्छा प्रकट केली आहे यामध्ये काम करणारे कलाकार आणि सर्वच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे म्हणूनच शिवशक्ती प्रोडक्शन लवकरच आपल्या भेटीला *Bee Prime* या ott प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहे नमुने बॅक टू स्कूल आणि या वेब सिरीज चे येत्या 27 तारखेला ट्रेलर  प्रसारित करण्याचे घोषित दिग्दर्शक लेखक ईश्वर नारायण गवंडी यांना सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment