सी. एल. न्युजच्या वाचकांनी सापांच्या मालिकेविषयी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया ६ ते १० - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2020

सी. एल. न्युजच्या वाचकांनी सापांच्या मालिकेविषयी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया ६ ते १०

सी. एल. न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका वाचकांच्या प्रतिक्रिया
गवत्या (Green Keel back)

सी. एल. न्यूज चॅनेल च्या सर्व वाचकांना मनःपूर्वक नमस्कार, 
       मागील दोन महिन्यात आपणासमोर सापांची माहिती देणारी ३८ भागांची मालिका सुरू होती ती समाप्त होत आहे. काही वेळा महापूर, नेटवर्क व तंत्रिक समस्येमुळे मालिका खंडित होऊनही आपण भरभरून प्रतिसाद दिलात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीसह सर्व ठिकाणचे नागपंचमी उत्सव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलचे संपादक संपत पाटील तसेच पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी नागपंचमी पासून सी एल न्यूज च्या वाचकांसाठी सापांची माहिती देणारी मालिका सुरू करावी अशी मला विनंती केली. हे शिवधनुष्य मला पेलवेल की नाही? या विचारातच होकार दिला आणि ढोलगरवाडीचे सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, शेतकरी शिक्षण मंडळ व सर्पशाळेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, निवृत्त वन अधिकारी भरत पाटील आदींचे मार्गदर्शन व सहकार्यातून मालिकेला सुरुवात केली. याला केवळ चंदगड नव्हे तर कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रास   इतर राज्ये व परदेशातील सी एल च्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल चंदगड लाईव्ह न्युज च्या वतीने सर्वांचे शतशः धन्यवाद!  पुढील काळातही 'आपल्या हक्काचे व्यासपीठ' असलेल्या सी एल न्यूजला सर्वांनी ताकद द्यावी ही नम्र विनंती!!

 मालिका संपादक :- श्रीकांत व्ही. पाटील, कालकुंद्री ता. चंदगड. (उपाध्यक्ष- चंदगड तालुका पत्रकार संघ)

   सी. एल. न्यूजच्या अवाहनावरून मालिकेविषयी अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया प्रसारित करत आहोत.

--------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया क्र. ६

सदानंद पाटील

       गेले अनेक दिवस आपण सापांची माहिती देणारी मालिका  वाचत होतो, रोज वेगवेगळ्या जातीच्या सापांची ओळख वैशिष्ट्य आणि जैवविविधतेमधील त्यांचे महत्त्व, अशी माहिती  सी एल न्यूज ने आपल्यापर्यंत पोचवली. 'वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे ज्यांनी ही माहिती वाचली त्याच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडलेली आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न  हे श्रेष्ठ दान आहे, तसे चंदगड लाईव्ह न्युज ने असंख्य वाचकांना योग्य व परिपूर्ण खाद्य पोहचवलं आहे.
       कसबी जादूगार असलेल्या निसर्गातील अर्धा फूट लांबीच्या वाळा ते तीस फूट लांबीच्या अजगर सापांबद्दल जनमानसातील भीती दूर करणारी कौतुकास्पद मालिका सुरू करण्याचा विचार ज्यांच्या सुपीक डोक्यातून निघाला ते संपादक संपत पाटील, ही अभ्यासपूर्ण मालिका पूर्णत्वास नेलेले, लेखणीतून समाजसेवेचा वसा जपलेले श्रीकांत पाटील व टिमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि  शुभेच्छा!
     -सदानंद  पाटील (जिल्हा उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर)
-----------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. ७
शिवाजी शंकर पाटील

       चंदगड लाईव्ह न्युजने सापांविषयी माहीती देणारी मालिका सुरु करुन वाचकांना वेगळे काहीतरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या मालिकेमुळे सर्पाचीं दुर्मिळ शास्त्रीय माहिती समजली. सर्पदंश कसे टाळायचे, प्रथमोपचार कसे करायचे, याविषयी जनजागृती झाली. सापाविषयीचे समज गैरसमज, भीती मनातून दूर होऊन सापांविषयी आदर निर्माण झाला आहे. माहिती संकलित करून सर्वांपर्यंत पोहोचवणारे आदरणीय श्रीकांत पाटील यांचे विशेष अभिनंदन!
         - शिवाजी शंकर पाटील (संचालक शिक्षक बँक कोल्हापूर)
-----------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. ८
अनिल बी. पाटील

       सापांच्या मालिकेतील १ ते ३८ भाग पाहिले, अनेकांना फॉरवर्ड सुद्धा केले. कोणते साप विषारी, कोणते बिनविषारी याची खूप छान आणि अभ्यासपूर्ण सचित्र माहिती मिळाली. ती शेतकरी व सर्वांसाठी निरंतर उपयोगी ठरेल.
वाचकांच्या नितांत गरजेचा उपक्रम घेऊन तो यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणारे श्रीकांत पाटील, चंदगड लाईव्ह न्युज व चंदगड पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज चॅनेल चे हार्दिक आभार!!
- अनिल बी. पाटील, राजकोट- गुजरात (मराठा सेवा संघ, गुजरात राज्य कार्याध्यक्ष. अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ, राजकोट)
---------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. ९
सुरेश नाईक
       चंदगड लाईव्ह न्यूजने सापांविषयी जी मालिका नागपंचमीपासून सुरू केली होती; ती खास करून ग्रामीण भागाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व महत्वाची होती. सापांविषयी ग्रामीण भागात फारच गैरसमज आहेत.  मालिकेमुळे विषारी व बिनविषारी सापांच्या प्रबोधनाने लोकांचे सापांप्रती भय नाहीसे होऊन तो शेतकऱ्याचा मित्र बनून राहील असा विश्वास वाटतो. या मालिकेचे प्रमुख आमचे गुरुवर्य श्रीकांत पाटील यांनी अप्रतिम असे शब्दांकन केले आहे. त्यांना व चंदगड लाईव्ह टीमच्या सर्व पत्रकारांना धन्यवाद!
-सुरेश नाईक, माजी सरपंच कालकुंद्री, ता. चंदगड.
------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. १०
वाय. के. चौधरी

                    चंदगड लाईव्ह चे खूप खूप आभार,
सापांविषयी जागृती ही मालिका अखंडीत सुरू करून सापांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून साप आपला नैसर्गिकरित्या सोबती आहे, हे कळले.याबरोबरच विषारी व बिनविषारी सापांचे वर्गीकरण, कोणत्या सापापासून धोका आहे, आपण काळजी/ दक्षता कशी घ्यावी, योग्य वेळी प्रथमोपचार, इलाज कसे करावे याची प्रथमच सखोल माहिती मिळाली. चंदगड लाईव्हचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण व समाजाला दिशा देणारा आहे. धन्यवाद!
               वाय. के. चौधरी (केंद्रप्रमुख हलकर्णी ता.चंदगड)
---------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment