तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे आकाश पाटील कोरोना योध्यांचा प्रशस्तिपत्रक देवून गौरव करताना. |
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
कोविड-१९ च्या या संकमण काळात सतत समाजासाठी काम करून कोरोना योध्दा चा मान मिळवलेल्या पोलीस कर्मचारी,आशा सेविका, ग्रामपंचायत शिपाई, मेडिकल्स, न्यूज रिपोर्टर यांचा कोविड योद्धा असे फार्मसी कृती समितीचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष आकाश प्रकाश पाटील यानी प्रशस्तीपत्र देवून कोविड-१९ कार्याचा गौरव केला.
येथे त्यांच्या कार्याचे अभिनंदन करताना त्यांच्या पुढील कार्यासाठी फार्मसी डे निमित्य शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कोवाडचे सहा. फौजदार एच. एस. नाईक, एम. पी. चव्हाण, ए. एस. साबळे, खुशाल शिंदे, अमर सायेकर आदि पोलिसांचा तर अश्वीनी गिरी, सुवर्णा भिंगुडे, सुलोचना भिंगुडे, राजश्री पाटील या अंगणवाडी सेविका, प्रकाश पाटील (पोलिस पाटील), एम. ए. पाटील, अनंत पाटील (शिक्षक), परसू पाटील, नरसू कांबळे (ग्रामपंचायत शिपाई), स्वागत पाटील (संयसेवक), भाऊराव पाटील, जोतिबा भोगण, प्रसाद हल्याळी (मेडिकल) आदिंचा गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment