चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक आनंदा हळदणकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक,नागरीकांना मास्क वाटप करताना.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी चंदगड येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत नगरसेवक आनंदा उर्फ बाळासाहेब हळदणकर यांनी घरोघरी जाऊन व्यक्तींचा सर्वे केला. तसेच बाहेरून आलेल्या व घरामधील व्यक्तींना ताप, थंडी, खोकला या प्रकारचा त्रास होतो का ही विचारणा करून आरोग्याची काळजी स्वतः घेण्याबाबत माहिती दिली. तसेच कोरणा पासून बचावासाठी आवश्यक असणारे मास्क ही वाटप केले. यावेळी आशा सेविका संगीता शिवणेकर अंगणवाडी सेविका रोहिणी कांबळे शबाना मदार प्राथमिक शिक्षक नियाज मुल्ला आणि राजू सोनुले इत्यादी सोबत होते.
No comments:
Post a Comment