सैन्यदलाचे निवृत्त हवालदार उदय मुतकेकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2020

सैन्यदलाचे निवृत्त हवालदार उदय मुतकेकर यांना मातृशोक

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सुभद्रा भावकु मुतकेकर (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय सैन्य दलाचे निवृत्त हवालदार  भावकु मुतकेकर  यांच्या त्या पत्नी, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त हवालदार उदय मुतकेकर यांच्या मातोश्री, जवान राहुल मुतकेकर यांच्या त्या आजी होत्या. बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील बालवीर महिला सोसायटीचे मॅनेजर पी. एस. भोगण (कागणी) यांच्या त्या सासू होत्या.

No comments:

Post a Comment