आर्थिक मंदीतही शिक्षक बँक सभासदांच्या सेवेसाठी खंबीर -चेअरमन जी एस पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2020

आर्थिक मंदीतही शिक्षक बँक सभासदांच्या सेवेसाठी खंबीर -चेअरमन जी एस पाटील

 


शिक्षक बँक शाखा हलकर्णी येथे डीसीपीएस धारकांना ठेव प्रमाणपत्रे देताना चेअरमन पाटील सोबत संघटना पदाधिकारी.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोरोना संसर्गामुळे आलेल्या जागतिक मंदीच्या काळातही शिक्षक बँक सभासदांच्या स्वप्नपूर्तीसाठी सक्षम पणे उभी असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन जी एस पाटील यांनी केले. ते हलकर्णी तालुका चंदगड येथील शिक्षक बँक शाखेला सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होते. 
प्रास्ताविक बँकेचे संचालक शिवाजी पाटील यांनी केले. देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन भरमू तारीहाळकर यांनी स्वागत केले. यावेळी चेअरमन पाटील यांनी बँक प्रगतीच्या चढत्या आलेखाचा आढावा घेतला. त्यांच्या हस्ते डीसीपीएस धारकांना विशेष ठेव योजनेची प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्याध्यक्ष शाहू पाटील सर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा सांगितला. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रमेश हुद्दार, मार्गदर्शक वसंत जोशिलकर, कागल तालुका अध्यक्ष राजुगडे, रावण, ननवरे, दशरथ सुतार, पदवीधरचे अध्यक्ष अशोक नौकुडकर, शिक्षक संघ जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील व टी जे पाटील, भरमाणा मुरकुटे, नागोजी भोसले, संजय घोळसे, विजय सिद्धाप्पा पाटील, अनंत धोत्रे, दस्तगिर उस्ताद, परशराम नाईक, डीसीपीएस धारक संघटनेचे कोषाध्यक्ष बाळाराम नाईक, संघटक नित्यानंद हुद्दार, आदींसह शाखा चेअरमन जयसिंग देसाई व कर्मचारी उपस्थित होते. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सटूप्पा फडके यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment