कोवाड महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2020

कोवाड महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन कर्मचारी महासंघ व विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोवाड महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.
 सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे,  वित्त विभागाने सेवा वेतन भत्ते लागू केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी लागू कराव्यात आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक २४ सप्टेंबर पासून हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन केले. यात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडचे कर्मचारी सहभागी झाले. 
  २४ ते ३० सप्टेंबर पर्यंत लेखणीबंद आंदोलन सुरू राहणार आहे. तोडगा न निघाल्यास एक ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे कर्मचारी विलास शेटजी, डी पी पाटील, डी जे पाटील, एम व्ही बिरजे, पी जे पाटील, एन जे पाटील, एल डी बागिलगेकर, ए व्ही व्हन्याळकर, डी के पाटील, आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment