![]() |
राजगोळी खुर्द : अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप प्रसंगी उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ. |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील बस थांबा जवळील ओम गणेश सार्वजनिक मंडळातर्फे ग्रामस्थांना मोफत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. चंदगड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने हा उपक्रम राबवला. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या मंडळाने गावात कोरोनाबाबत जनजागृतीही केली आहे. गोळ्या वाटप प्रसंगी सरपंच मावळेश्वर कुंभार,विलास पाटील,सुनील मोरे, यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment