राजगोळी बु. येथे नुकसान झालेल्या ऊस, भात पिकाचे पंचनामे - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2020

राजगोळी बु. येथे नुकसान झालेल्या ऊस, भात पिकाचे पंचनामे

राजगोळी बु : पिकांचे पंचनामा करताना एस डी मुळे, ये. बी. कांबळे, कोळी, काशिनाथ कांबळे, शिवाजी सडाके आदी.

कोवाड : सी एल वृत्तसेवा
          राजगोळी बु (ता. चंदगड) या परिसरातील वादळी वारा आणि मुसळधार पावसाने झालेल्या ऊस पिकाचे नुकसान व महापुराने नुकसान झालेल्या भात पिकाचे कृषी विभागा कडून पंचनामे सुरू केले आहेत.
या गावची नदीला लागून मोठ्या प्रमाणात शेती आहे. यंदा दोन वेळा महापूर आला. या महापुरात भात पीक कुजण्याच्या मार्गावर आहे.  कृषी सहाय्यक एस डी मुळे, ग्रामसेवक ये. बी. कांबळे, तलाठी कोळी पोलीस पाटील काशिनाथ कांबळे सरपंच शिवाजी सडाके, भावकु गुरव, तुकाराम गुरव, संतराम पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment