संग्रहित छायाचित्र |
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काजू लागवडीसाठी अनुदान दिले जाते. यापूर्वी 7x7 मी अंतरावर लागवड करणे बंधनकारक होते, परंतु आता ही अट शिथिल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी जर शेतपरिस्थितीनुसार काजू लागवड केल्यास जास्तीतजास्त 200 झाडाकरिता रू 119000 अनुदान मिळणार आहे.
तालुक्यातील शेतकरी 7x7 ऐवजी कमी अंतरावर लागवड करतात त्यामुळे ते अनुदान मिळण्यास अपात्र होत होते, नवीन नियमानुसार त्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळणार आहे, तरी 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत. अनुसूचित जाती व जमाती करिता क्षेत्राची अट नाही. यासाठी जॉब कार्ड , ७ / १२ उतारा, ८ अ, अल्प भू धारक दाखला, बॅँक पासबूक व आधार कार्ड लागणार आहे. तरी याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment